Categories
Marathi Birthday SMS
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो, नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली पूर्वीचेच क्षण
तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले पूर्वीचेच दिवस तुझ्या
प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल
नातं बस्स! आणखी काही नको काहीच! वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण,
त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते
असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास
माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस अभिनंदन!
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या
असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस
जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही
दिवस वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी
सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून
जावे हिच सदिच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी, या प्राप्तीचा
मोहोत्सव करताना हवी असतात काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही
अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या
नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले,
काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही
कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी
अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा.
तुमच्याशी असणारं आमचं नातं आता इतकं दृढ झालंय की
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच
वाटत राहते तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं आमच्यात
तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता वाटतं, तुमचा
सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये
सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा
स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली, तुझ्या
मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे
आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या
मैत्रीचा पाया, सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने
आणावी जीवनात अपूर्व पर्वणी वाढदिवसाच्या शुभकामना.
आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो, पण त्यातली
सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत काही नाती
क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात, पण
त्यातही कधी कधी असं एखाद नातं आपण जोडतो, जे
नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या
क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा
देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं
साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!