Categories
Marathi SMS [Marathi Birthday SMS]
आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं
समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी, वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा! वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे
अर्थ तुझ्या अस्तित्वाने तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा माझी प्रत्येक
चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप खुप
सुखी ठेव माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
हळदीच्या पावलांनी या घरात आले, माहेर विसरून या
घरची झाले दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला, जो क्षणोक्षणी
पाठीशी उभा ठाकला त्याच्या प्रेमाची परतफेड कशी
करू? कशी त्याची उतराई ठरू? माझे आयुष्य त्याला
लाभो, हीच प्रार्थना करते माझ्या कृतज्ञेची अंजली,
त्याच्या पायी वाहते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणापासून एकत्र राहतांना, भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना, आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण! पण तरीही मनातलं प्रेम,
माया अगदी लहानपणी जशी होती तशीच ती आजही आहे
उलट काळाच्या ओघात ती अधिकाधिक द्दढ होत गेली याचं
सारं श्रेय खरं तर तुला आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
आज तु मोठा झालास हे अगदी खरं पण आई बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे! मुलांच्या अनंत चुकांना
क्षमा करणं अनेक दोषांसहीत, प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं
जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती
म्हणून त्यांचा, सर्वांगीण विकास घडविणं ह्याचसाठी तर धडपड
असते प्रत्येक आईबाबांची! खुप मोठा हो कीर्तिवंत हो आमचे
आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात कधी
कधी तर तू मला आपली आईच वाटतेस माझ्या
भावनांना, केवळ तूच समजून घेतेस माझ्या जराशा
दुःखाने, तुझे डोळे भरून येतात अशी माझ्याबद्दल
हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही
वाटतेस मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो तूच
आम्हाला धीर देतेस तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा.
कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून
जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं तुझ्या
वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास
आहे कि, हे तू समजून घेशील
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक
आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू
बनलात आमचे श्वास तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला तुम्हाला दीर्घाय लाभ
दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे!
आपण खूप ठरवतो एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं पण, पण नशीब हि अशी गोष्ट
आहे, जिथे कोणाचंच काहीच चालत नाही ! मी खूप प्रयत्न
करूनही मला, त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व! पण तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण
माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही!
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद भावजयीचे
नाते मैत्रीचे झाले आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस! खूप खूप शुभेच्छाची
भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि
सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!