Categories
Marathi SMS [Marathi Birthday SMS]
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत
तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत
होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात
नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा.
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र
ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा
माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही
आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि
समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान
आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा
तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास
आहे यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक
आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच
असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी
तर ठरलेलीच असते, मग कधी करायची
पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
तुमचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत
प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे, तुमचा सहवास
नेहमीच हवाहवासा वाटतो! कुणाशीही, अगदी विचारांचे मतभेद
असणाऱ्या माणसांशीही, तुमची अगदी जिवलग मैत्री असते म्हणून
तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं हेच त्याच्याकडे मागणं!
तुमच्या आयुष्याचा प्रवास या वळणावर आलेला असतांना,
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट, तुमची साधना,
आणि जगण्यातून आमच्यापुढे तुम्ही ठेवलेला आदर्श इथून
पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन
देवो हीच या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही!
प्रिय आजी, अजुनही हवाहवासा वाटतो, तुझा मायेचा स्पर्श!
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात, तुझ्या राजा-राणीच्या
गोष्टी अजुनही आठवतात, तुझी चांदोमामांची गाणी
अजुनही हवीशी वाटते, तुझ्या मायेची कुस अजुनही
हवासा वाटतो, तुझा आशीर्वाद आणि जगण्याला नवं
बळ देणारी तू अजुनही अजुनही हविहवीशीच वाटतेस!
परमेश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं हेच त्याच्याकडे मागणं!
प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं हे
खरं आहे पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन, की एक दिवस, हे जग तुम्हाला
माझ्या नावाने ओळखेल तुम्ही माझ्यावर केलेले एक एक
संस्कार, तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार विचार, या
पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे खरंच बाबा,
केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात हे यश आहे!
आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी, तुमची सारी
स्वप्नं पूर्ण करून दाखवेन! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!