Categories
Marathi SMS
आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेवुनी
आली अश्विनातली विजयादशमी
दस-याच्या आज शुभ दिनी सुख
समृद्धि नांदो तुमच्या जीवनी शुभ दसरा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी
दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ
सोन्यासारख्या लोकांना हॅप्पी दसरा!
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो
आनंद मनी जल्लोष विजयाचा
हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी
हा दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती
मना मनांची विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील
सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा
तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज
रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा.
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला
प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया
दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो.
झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण
दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे
अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा
कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी.
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा.
वाईटावर चांगल्याची मात, महत्व या
दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष
मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच
प्रेम वसे विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!